दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : आज सहकारी साखर कारखानदारीवर खाजगीशी स्पर्धा आणि समस्या आहेत. कारखान्याचा कुटुंबप्रमुख या नात्याने आतापर्यंत सभासद व कामगारांनी जो विश्वास दाखविला आहे, त्या विश्वासाच्या जोरावर मी व माझे व्यवस्थापन वाटचाल करीत आहे. पुढील काळात याच विश्वासाच्या व आपल्या कौटुंबिक एकीच्या जोरावर कोणतेही संकट यशस्वीपणे परतावून लावू असा विश्वास किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला.
येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जांबच्या उजाड माळरानावर किसन वीर आबांनी कारखान्याचं एक स्वप्न पाहिलं ते स्वप्न साकार केलं व आज ते बहरलं आहे. त्यावेळीही समाजातील काही अपप्रवृत्तीनं आबांवर टिका केलेली होती.
परंतू आबांनी त्याकडे दुर्लक्ष करून कारखाना उभा केला. त्यावेळी तंत्रज्ञान एवढ प्रगत नसतांनाही जुन्या पिढीतील आबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखान्याची उभारणी करून अपप्रवृत्तींना उत्तर दिलं. सन २००३ साली सभासदांनी विश्वासाने कारखान्याची सुत्रे हातात दिल्यानंतर नवनविन प्रकल्प उभारल्यानंतर संस्थेची जी प्रगती झालेली आहे, ती सर्वांसमोर आहे.
खंडाळा व प्रतापगड कारखान्यामध्ये आर्थिक गुंतवणुकीमुळे कारखान्यावर आर्थिक ताण आलेला आहे, ही वस्तुस्थिती असली तरी आमच्यासमोर प्रतापगड व खंडाळा कारखान्याचे सभासद, कामगारांचे हित जोपासण्याचा आमचा प्रामाणिक उद्देश होता व आहे. या प्रगतीमध्ये समाजातील काही अपप्रवृत्ती जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करून संस्था कशापद्धतीने अडचणीत येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत.
त्यामुळे ऊस उत्पादक सभासद व कामगारांची देणी देण्यास विलंब होत आहे. सभासदांमध्ये चुकीचा प्रचार करून त्यांची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. सभासद व कामगारांनी संस्थेबाबत व व्यवस्थापनाबाबत जो चांगुलपणा, सोशिकता, उदारता दाखविल्याबद्दल व जी साथ दिली त्याबद्दल श्री. भोसले यांनी आभार व्यक्त करून हंगाम लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. यावेळी ऑनलाईन सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे अध्यक्षांनी दिली. विषय पत्रिकेवरील सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. स्वागत संचालक नंदकुमार निकम यांनी केले. दुखवट्याचा ठराव संचालक चंद्रकांत इंगवले यांनी मानले. विषय पत्रिकेचे वाचन सचिव एन. एन. काळोखे यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रविण जगताप, प्रताप यादव देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, आशा फाळके, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक शिंदे, मोहनरश भोसले, सतिश भोसले, अॅड. विजयराव भोसले, अॅड. धनंजय चव्हाण, विलास जाधवराव, अर्जुन भोसले, धर्मराज शिंदे, सुरेश पवार, अनिल वाघमळे, डॉ. दत्तात्रय फाळके, जयवंत साबळे, मेघराज भोईटे, सुनिल शिवथरे, हणमंत गायकवाड, राजेंद्र धुमाळ, विशाल डेरे, कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते..