अमोल होरणे : महान्युज लाईव्ह
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील येळी येथे डाळिंब पिकाची शेतीशाळा आयोजित केली होती त्यावेळी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव येथील शास्त्रज्ञ नंदकिशोर दहातोंडे यांचे मार्गदर्शन कृषी विभागाच्या वतीने आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
एखाद्या शेतकऱ्याला यावर्षी डाळिंबामध्ये चांगले पैसे मिळाले, म्हणून आपणही डाळिंबाची लागवड करावी असे समजून शेतकरी डाळिंबाची लागवड करतो. परंतु डाळिंब पिकाचे यशस्वी उत्पादन घेण्यासाठी लागवडीपासून विक्रीपर्यंत नियोजन करावे लागते. यासंदर्भातील मार्गदर्शन या वेळी शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी दहातोंडे यांनी डाळिंब लागवड विषयक माहिती देताना सांगितले की डाळिंब रोपे खरेदी करताना शासकीय रोपवाटिकेतून किंवा किंवा शासनमान्य मान्यता प्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षण केल्यानंतर मृदआरोग्य पत्रिकेतील निर्देशानुसार खत व्यवस्थापन करावे.
डाळिंब पिकावर पडणारे विविध किड रोगांची माहिती देऊन व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सांगितले. बहार व्यवस्थापन बाबत माहिती दिली तसेच रमेश जायभाये यांच्या शेतामध्ये छाटणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी फळबाग हे उत्तम मार्ग आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. महाडीबीटी पोर्टल वर एक अर्ज अनेक योजना अंतर्गत कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर दौंड, प्रकाश गायके, सुनंदा खेडकर, बी. टी.एम.सुजित गायकवाड, ढमाळ, महादेव जायभाये, अशोक पालवे, नारायण बडे, ज्ञानदेव डमाळे, मारुती बडे, विष्णू बडे, विश्वनाथ लटपटे, शिवनाथ फुंदे, अंकुश कराड, देविदास कराड, रमेश जायभाये, बाळासाहेब ढोले, बाळासाहेब बडे, पांडुरंग पाखरे शेतकरी उपस्थित होते.