अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
वाघोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंकित वाघोली पोलीस दूर क्षेत्राच्या चौकीचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पोलिस अधिकारी कक्ष कार्यालयाची फित कापण्याचा बहुमान गुप्ता यांनी तेथील पोलीस अंमलदार बाळासाहेब हराळ यांना दिला आणि आयुक्तांनी सर्वांची मने जिंकली.
वाघोली येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी सहआयुक्त डॉक्टर राजेंद्र शिसवे, शिरूर-हवेलीचे आमदार एडवोकेट अशोक पवार, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, वाघोली चुकीचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक शिवकांत खोसे आणि इतर वरिष्ठ अधिकारी व वाघोली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
वाघोली येथे झालेल्या पोलीस चौकीमुळे नागरिकांना आपली तक्रार नोंदवणे सोयीस्कर होणार असून तात्काळ पोलिसांची मदत मिळण्यासाठी ही मदत होणार आहे. वाघोली गावची लोकसंख्या दोन लाखाच्या आसपास असल्याने याठिकाणी पोलिस दूरक्षेत्र नव्याने सुरू करण्यात आले आहे.