थोडक्यात बचावला अभियंता दोन राऊंड फायरिंग झाली आरोपी फरार.. पांढऱ्या रंगाच्या कोट मध्ये आले होते बंदूकधारी..
अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
मुंबईतील बोरवली च्या कस्तुरबा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एक फायरिंग ची घटना समोर आली आहे. फायरिंग दोन बाईकस्वार यांनी केली असून सफेत रंगाचा कोट घालून हे दोन बाईकस्वार आले होते.
त्यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या बांधकाम अभियंता दीपक खांबा यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन राऊंड गोळ्या त्यांनी झाडल्या. मात्र या घटनेत खांबा थोडक्यात बचावले.
अभियंता खांबा हे मुंबईवरून मिरारोड स्थानकाकडे निघाले होते. बोरवली नॅशनल पार्क हायवेवर श्री कृष्णा कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या समोर त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायरवर दोन राऊंड फायरिंग करण्यात आली.
चारचाकी असल्याने व काही अंतरावरून गोळ्या झाडल्याने यामध्ये अभियंता थोडक्यात बचावले. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याकडे देण्यात आला असून ते या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.