महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कोरोना चा उगम कोठे झाला? हा प्रश्न आता दोन वर्षाच्या मुलापासून ते अगदी शंभर वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कोणीही असला तरी उत्तर देईल तो देश म्हणजे चीन..! या चिन्यांच्या राज्यात काय घडेल याचा नेम नाही. अगोदरच कोरोनाची लागण यांनी लपवली होती. असे जगभरातील देश ओरडून सांगत आहेत. आता चीनमध्ये नव्याने कोरोना चे विषाणू आढळून येत आहेत.
काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये तीन मांजरींना कोरोना ची लागण झाली. प्राण्यांना कोरोनाची लागण होत नाही, परंतु झालीच, तर प्राण्यांकडून माणसांना कोरोनाचा होणारा प्रसार अधिक धोकादायक असतो हे लक्षात आल्याने चीनमधील या तीन मांजरींना प्रशासनाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
चीनमधील हर्बिन भागात जवळपास शंभर लोकांना कोरोना ची लागण झाली आहे. यामध्ये तीन मांजरींना देखील कोरोनाची लागण झाल्याचे 22 सप्टेंबर रोजी समोर आले, तेव्हा प्रशासन सतर्क झाले. या मांजरी त्यांच्या मालकांच्या अतिशय आवडीच्या आहेत. त्यामुळे मालकाने सुरवातीला या मांजरींना आयसोलेट केले. क्वारंटाईन केले.
परंतु त्यानंतरही त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने या मांजरांना मारण्याचा निर्णय घेतला. कोरोना ची लागण झालेल्या या मांजरी संबंधित इमारतीसह त्या परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनू शकतात. असे सांगत प्रशासनाने मालकाच्या अपिलावर निर्णय घेताना मांजरींना मारण्याचा आदेश दिला.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चीन सरकार अशाप्रकारे कठोर उपाय आखते हे ही जगाच्या समोर आले. गोष्ट मांजरीची होती, परंतु चीन सरकारच्या धोरणाची देखील या निमित्ताने जगभर आला माहिती झाली.