दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव येथील रेल्वेस्टेशन येथे रेल्वे मालगाडीच्या धडकेत हातवळण येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय पोपट गांधले (वय 40 रा. हातवळण ता.दौंड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
गांधले हे हातवळण येथे किराणा व्यवसाय करत होते. मंगळवारी ( दि.२८) दुपारी साडे तीन वाजता पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीची गांधले हे रेल्वे रूळ ओलांडत असताना धडक बसली.
या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हातवळण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक ए.पी.झाडगे हे करीत आहेत.