बीड ::महान्यूज लाईव्ह
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस काहीसा कमी असला तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे मराठवाड्यात आत्तापर्यंत जणांचा मृत्यू झाला असून 20 लाखांहून अधिक हेक्टरवरील शेत जमीन नुकसान झाले आहे तर चार ते पाच हजार जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ उमरखेड एसटी पुलावरुन पाणी वाहत असताना ही बस चालकाने पुलावरून घातल्यानंतर वाहून गेली होती. त्यातील तीन जणांचे मृतदेह बचाव पथकाला काढण्यात यश आले. वाहनचालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान मांजरा धरणाकाठी पूरस्थिती निर्माण झाली असून मांजरा धरणातील विसर्गानंतर जवळपास तीस जण अडकले होते. या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील पावसामुळे वांधरी नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंजन नदीला देखील महापूर आला असून नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. तेरणा नदीच्या पुरात अडकलेल्या सहा मजुरांची हेलिकॉप्टरमधून सुटका करण्यात आली, मात्र या महापूराने तेर गावात घराघरात पाणी शिरले.
मांजरा धरणाचे सर्व 18 दरवाजे उघडावे लागले आहेत मांजरा धरणाचे सगळे दरवाजे उघडण्याची गेल्या काही दशकांतील ही पहिलीच वेळ आहे. नांदेड जिल्ह्यातील 85 पैकी 65 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत या पावसामुळे नद्या नाही महापूर येण्याची आला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिले आहेत नांदेड मधील गोदावरी, पैनगंगा, मन्याड, लेंडी, असना नद्यांना ही महापूर आला आहे