खंडाळा : महान्यूज लाईव्ह
कराड येथील रुक्मिणी पार्क वाखानरोड येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या उज्वला रघुनाथ ठाणेकर (वय ३५ वर्षे) या महिलेचा अज्ञात व्यक्तीने खू; न केला होता. याबाबत या महिलेच्या बहिणीचा पती सचिन बाळू निगडे (मलकापूर, कराड) याने कराड पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक अझयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट दिली व गुन्हा शोधून काढण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या.
त्यांनी सहायक निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे यांच्यासह सहकाऱ्यांचे पथक तयार करून सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचेही फुटेज तपासले.
मात्र काहीच आढळून न आल्याने पोलिसांपुढेही आव्हान उभे होते. त्यानंतर त्यांनी उज्वला हिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यातच घटनास्थळावरील स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचा खू; न एका महिला व पुरूषाने मिळून केल्याची माहिती मिळाली. त्यावरून या महिलेची बहिण व तिचा प्रियकर यांना बोलावून घेतले व त्यांच्याकडे तपास केला.
त्यावरून पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात सख्ख्या बहिणीनेच प्रियकराच्या मदतीने बहिणीचा खू; न केल्याचे उघड झाले. पतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याने आपला संसार उध्वस्त झाल्याच्या रागातून हा खू; न झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कोणतीही माहिती नसताना, पुरावा नसताना चौकशी व कौशल्याचा वापर करून पोलिसांनी हा खू ;न उघडकीस आणल्याने पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले.
ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या सूचनेनुसार व पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंह साबळे, फौजदार गणेश वाध, सहायक फौजदार उत्तम दबडे, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ संकपाळ, संतोष पवार, संतोष सपकाळ,
शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अजित कर्णे, अमोल माने, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, प्रविण पवार मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, संकेत निकम, धीरज महाडीक, विजय. सावंत, सायबर पोलिस ठाण्याचे प्रविण आहिरे, महेश पवार. अनिकेत जाधव यांनी केली.