शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरसगाव काटा (ता.शिरूर)येथील सरपंच ज्योती संतोष जाधव यांना नुकताच आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कोल्हापूर येथे पुरस्कार समारंभ पार पडला यावेळी संपूर्ण राज्यभरातील सरपंच तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
ज्योती संतोष जाधव यांनी सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनाचे संकट सुरू झाले. या संकटातही धीराने तोंड देत ग्रामपंचायत सहकाऱ्यांच्या मदतीने विविध उपाययोजना राबविल्या. तसेच सातत्याने विविध कामांसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, स्वागताध्यक्ष शंकर खेमनार, मुख्य मार्गदर्शक जयदीप वानखेडे, सरचिटणीस बाबासो पावसे, अध्यक्ष भाऊसाहेब मरगळे, प्रमिला एखंडे, भाग्यश्री नरवडे आदी उपस्थित होते.