धुळे महान्यूज लाईव्ह
धुळ्यातील जामदा गावात किर्तन सुरू असताना क्रांतीकारी किर्तनकार म्हणून ओळखले जात असलेल्या ताजोद्दीन महाराजांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेने उभा महाराष्ट्र हळहळला..
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
ताजोद्दीन महाराज हे जरी मुस्लीम असले तरी त्यांचा भागवत संप्रदायातील अभ्यास प्रचंड होता. २७ सप्टेंबर रोजी रात्री धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरनजिक जामदा गावात त्यांचे किर्तन होते. किर्तन सुरू झाले आणि काही मिनीटांतच त्यांना अचानक त्रास सुरू झाला. ते खाली बसले आणि ते तसेच एका भजनीकऱ्याच्या मांडीवर डोके टेकवून पडले.
त्याक्षणी त्यांचा मृत्यू झाला. किर्तनात साथ देण्यास असलेल्या भजनी मंडळाला त्यांना चक्कर आली असावी अशी शंका आली. त्यामुळे काही जण पाणी आणण्यासाठी गेले. मात्र तोपर्यंत महाराजांना तीव्र हृदयविकाराचा झटका असल्याने त्यांचे निधन झाले होते.
हिंदू मुस्लीम दरी मिटलण्यासाठी त्यांनी हजारो किर्तने केली. औरंगाबाद शहराजवळील सातारा येथे त्यांचा जन्म झाला. ते जालना जिल्ह्याकी घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते. ताजोद्दीन यांना मानणारा वारकरी वर्ग मोठा होता.त्यांच्या या अचानक जाण्याने उभ्या् महाराष्ट्रातील वारकरी बांधवांना मोठा धक्का बसला.