बीड : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील केज तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड पाणी येऊन मांजरा धरणाकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
दोन दिवसात सुरु असलेल्या पावसाचा परिणाम मराठवाड्यातही दिसू लागला असून, बीड जिल्ह्यातील केज आणि आंबेजोगाई चा संपर्क तुटला आहे. काल केज तालुक्यात ढगफुटी सारखाच पाऊस पडला. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने मांजरा धरणामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला असून दुसरीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.