आज जगात काय चाललंय? : डॉ सुजित अडसूळ, बारामती
अँस्ट्राजिनीका, बायोटेक, जॉन्सन अंड जॉन्सन, मोडर्ना,नोवावॅक्स आणि फायझर या लस उत्पादक कंपन्या जागतिक स्तरावर सर्वांना लस देण्यास टाळाटाळ होत आहे. यामधे फक्त नफेखोरीचाच विचार होताना दिसत आहे.
गरीब राष्ट्रांच्या एक टक्क्यापेक्षा कमी लोकांनाच लस देण्यात आली असून श्रीमंत राष्ट्रांच्या जवळजवळ साठ टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. फायझर आणि बायोटेक या कंपन्यांनी आत्तापर्यंत स्विडन या अतीश्रीमंत देशाला जवळजवळ दहा पट लसीचा पुरवठा केला असून यामध्ये त्यांनी 86 दशलक्ष डॉलर नफा मिळवला आहे.
मॉडर्ना या कंपनीने आत्तापर्यंत एकाही गरीब राष्ट्राला लस पुरवठा केलेला नाही. तर मध्यम उत्पन्न असणार्या राष्ट्रांना फक्त 12 टक्के लस पुरवठा केलेला आहे. एका आकडेवारीनुसार 47 दशलक्ष डॉलरचा नफा 2022 पर्यंत या कंपनीला होऊ शकतो.
जॉन्सन अॅंड जॉन्सन ही कंपनी फक्त सिंगल डोस वँक्सिन बनवते. या कंपनीने आतापर्यंत एकाही गरीब राष्ट्रांना पुरवठा केलेला नाही. आणि कुणालाही उत्पादन करण्यासाठी लायसन्स दिले नाही.
अस्ट्राजेनिका या कंपनीने मात्र गरीब राष्ट्रांना लक्ष पुरवठा केलेला आहे. फायद्याचे प्रमाण कमी ठेवून सर्वांना लस मिळेल याची दक्षता घेत आहेत. तसेच काही स्थानिक उत्पादकांना लायसन्सही दिलेले आहे. परंतु त्यांनी शास्त्रीय ज्ञान व टेक्नॉलॉजी देण्यास मज्जाव केला आहे.
नोवावॅक्स या कंपनीला अजून अधिकृत मान्यता मिळायची आहे. परंतु या कंपनीने 70 टक्के पुरवठा नोवावँक्स कंपनीला करायचे ठरवले आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय माहिती देण्यास सहमती दर्शवली आहे.