वय अवघे 19 वर्ष… पोटाचा विकार आणि वेदना सहन होत नाहीत, म्हणून त्या शांत, समजूतदार मुलाने या जगाचा निरोप घेतला..!

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

पोटाच्या सतत होत असणाऱ्या असहाय्य वेदनांना अक्षरशः तो कंटाळला. वृद्धापकाळात आपल्या काठी म्हणून आई-वडिलांनी सतत नजरेने टिपल्या जाणाऱ्या एकुलत्या एक एकोणीस वर्षीय युवकाने जर्जर वाटणाऱ्या आजाराला संपवण्यासाठी स्वतः मृत्यूला कवटाळले.

अगदी शांत व संयमी असणाऱ्या भादलवाडी च्या अभिषेक रामकृष्ण एकाळे (वय 19) याने केलेल्या आत्महत्येने घरात दुःखाचा डोंगर तर कोसळला, पण गावातही शोककळा पसरली.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी या गावातील अभिषेक रामकृष्ण एकाळे या तरुण मुलाने गळफास लावून आत्महत्या केली.

याबाबत श्रीकृष्ण महादेव एकाळे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.ही घटना साधारणपणे रविवारी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत भिगवण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, रामकृष्ण महादेव एकाळे यांचा अभिषेक एकाळे (वय १९ वर्ष) हा एकुलता एक मुलगा होता.

स्वभावाने अतिशय शांत, समजदार असणारा अभिषेक मात्र पोटाच्या आजाराने त्रस्त होता. रविवारी श्रीकृष्ण एकाळे संध्याकाळी आठच्या सुमारास घरी कामावरून घरी आले असता त्यांना पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने त्यांचा पुतण्या अभिषेकने गळफास घेतल्याचे दिसून आले.

यावेळी त्यांनी तातडीने आरडाओरडा करीत मदतीला जवळच्या लोकांना बोलविले. अभिषेकला खाली घेतले. व ताबडतोब पुढील उपचारासाठी भिगवण येथील भिगवण आय.सी.यु. दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केले असता त्यास मृत घोषित केले.

याबाबत भिगवण पोलिसांनी आकस्मित मृत्यु अशी नोंद करीत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी इंदापूर जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृत्युपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत पोटाच्या आजारपणामुळे होणार त्रास असहाय्य होत असल्यामुळे आपण जीव देत असल्याची माहिती मिळत आहे. अभिषेकच्या या अचानकपणे घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे एकाळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

2 days ago