विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन: कोरेगावमुळ (ता. हवेली) येथील राजेंद्र अंबरनाथ शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या हवेली तालुका युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
वाघोली (ता. हवेली) येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शनिवारी (ता. २५) पार पडलेल्या कार्यक्रमात राजेंद्र शिंदे यांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, भाजपचे नेते प्रदिप कंद, पंचायत समितीचे सदस्य शाम गावडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, अनिल सातव, अमोल शिंवले, पुनम चौधरी, सरपंच स्वप्निल उंद्रे, रामदास काकडे, यश कोलते, अजित काकडे आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे हवेली तालुक्यात संघटन वाढवून, पक्ष बळकट करणासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या पदाच्या माध्यामातून तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना शिंदे यांनी सांगितले.