शिरूर : महान्यूज लाईव्ह
मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यांच्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे जिल्ह्यात विविध कंपनीच्या मोबाईल टाँवर च्या बँटरी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कारवाई करणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक नेमण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शिक्रापूर परिसरात पहाटेच्या वेळी गस्त करीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार सदरचा गुन्हा उदय बाळासाहेब काळे (रा. तळेगाव ढमढेरे) याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केल्याचे दिसून आले..
त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उदय बाळासाहेब काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार प्रवीण रमेश मांढरे (वय 30 वर्षे, रा. शिक्रापूर), अक्षय अशोक शेलार (वय 26 वर्षे, रा. तळेगाव ढमढेरे), अक्षय बाळासाहेब वांभुरे (वय 28 वर्षे, रा. वाडा गावठाण ता. शिरूर) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
या आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये त्यांनी शिक्रापूर पोस्टे चोरीचा गुन्हा देखील केल्याची कबुली दिलेली आहे. तसेच वर नमूद आरोपींनी दोन्ही गुन्ह्यातील एकुण 30 बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली असून चोरलेल्या बॅटऱ्या त्यांनी राजकुमार महादेव यादव (टिळेकर नगर सर्वे नंबर 52 कोंढवा बुद्रुक) पुणे यास विकल्याचे सांगितले.
गुन्हा करते वेळी त्यांनी राजकुमार यादव याचे अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन MH12SF 8205 हे बँटरी चोरी करण्यासाठी वापरल्याची कबुली दिली. सदर आरोपींकडुन गुन्हयात वापरलेला चारचाकी टेम्पो नं MH12-SF- 8205 किंमत 5 लाख रुपयेचा जप्त करण्यात आला असून पाचही आरोपींना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हा तपास पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, अजित भुजबळ, राजू मोमीन, सचिन घाडगे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, मुकुंद कदम, अक्षय जावळे यांनी केला आहे.