पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे तिथे काय उणे ही म्हण इतर बाबतीत होती. मात्र आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा पुण्यात काय उणे आहे? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिंचवड येथील सलीम लुकमान शेख याला पोलिसांनी पकडून नेल्यानंतर बापाने चक्क पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना मारहाण केली..!
याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी सलीम लुकमान शेख व त्याचा बाप इस्माईल शेख याला अटक केली आहे. पोलीस शिपाई अमोल माने यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. चिंचवड पोलिसांनी कोयता बाळगला म्हणून सलीमला पकडून चिंचवड पोलीस ठाण्यात आणले होते.
मुलाला पकडून नेले असे समजतात त्याचा बाप लुकमान शेख हा थेट पोलीस ठाण्याकडे धावतच गेला. बाहेरूनच पोलिसांना शिव्या देत आत आला. त्या वेळी पोलीस ठाण्यात असलेल्या व कर्मचार्यांना त्यांनी मारहाण केली व धमकावले. अमोल माने यांनाही त्यांनी धमकावले व मारहाण केली. त्यामुळे त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे मारहाण करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.