महान्यूज करियर अपडेट
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने 3261 जागांची भरती जाहीर करण्यात आली असून यामध्ये कनिष्ठ बीज विश्लेषक, कार ड्रायव्हर, चार्जमन, निदेशक व इतर अनेक पदांचा समावेश आहे. याकरता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबर 2021 आहे.
या भरतीत टेक्निकल असिस्टंट, रिसर्च इन्स्टिट्यूट , हिंदी सब एडिटर, इंग्लिश सब एडिटर, असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ, असिस्टंट टेक्निकल, जूनियर कॉम्प्युटर ऑपरेटर, अकाउंटंट क्लार्क अशा विविध पदांचा समावेश आहे. या करता उमेदवार हा किमान दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असावा अशी अट असून खुल्या प्रवर्गासाठी शंभर रुपयांचे परीक्षा शुल्क आहे.
याकरता ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची मुदत 28 ऑक्टोबर 2021 ही आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी शुल्क माफ व वयात शासकीय नियमानुसार सवलत राहणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी शासकीय नियमानुसार वयात सवलत असेल.
या परीक्षेतील परीक्षा केंद्र महाराष्ट्रासाठी मुंबई आणि पुणे या ठिकाणी असून साठ मिनिटांची परीक्षा राहणार असून, दोनशे गुण या परीक्षेसाठी असतील. खुल्या प्रवर्गासाठी किमान 35 टक्के, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 30 टक्के व इतर राखीव प्रवर्गासाठी 25 टक्के गुण या परीक्षेत पात्रतेसाठी आवश्यक आहेत.
यात अनेक पदांचा समावेश असून यातील बहुतेक सर्व पदे ही किमान वयोगटात 18 वर्षे असून कमाल पंचवीस ते अधिकाधिक तीस वर्षे वयापर्यंतच्या उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा असेल. अर्थात यात शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत असेल. अधिक व सविस्तर माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.