दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : महाराष्ट्रात सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या दि वाई अर्बन को. आँप. बँकेची आर्थिक वर्ष २०२०-२१ ची १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष सी.ए. चंद्रकांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता आँनलाईन पध्दतीने होणार आहे.
बँकेच्या सभासदांनी सदर वेळी आपापल्या ठिकाणावरून बँकेच्या संकेतस्थळावर http://www.waibank.co.in वर दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने सभेत सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी केले आहे.
वार्षिक सभेबाबत माहिती देताना श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की, बँकेच्या सभासदांची आँनलाईन पध्दतीने व्हिडीओ काँन्फरन्सव्दारे झूम, यू ट्यूब या अँपव्दारे वार्षिक सभा आयोजित केली आहे. सभासदांनी सभेत सहभागी होण्यासाठी आपले नाव, ई-मेल अँड्रेस व मोबाईल नंबर बँकेकडे नोंदवावा.
किंवा wub99agm@waibank.com या मेल अँड्रेसवर पाठवावा. तसेच गुरूवारी दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी साडेचार वाजता https://wub99agm.ruha.co.in या लिंकवर लॉगईन करावे किंवा बँकेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी. ज्या सभासदांचे मोबाईल नंबर आधीपासूनच नोंदविलेले आहेत. त्यांना एसएमएसव्दारे सभेची लिंक पाठविण्यात येणार आहे.