जगात आज काय चाललंय? : डॉ सुजित अडसूळ, बारामती
ब्रिटनचे माजी पंतप्रधान जॉर्डन ब्राऊन ज्यांनी आज मोठी भीती व्यक्त केली आहे. Covid Vaccine Waste Disaster, जवळजवळ एक कोटीहून अधिक लसीची मुदत डिसेंबरला संपत आहे. जागतिक स्तरावरील सर्व नेत्यांनी आपापल्या ठिकाणच्या जास्तीच्या लसी जगातील गरीब राष्ट्रांना त्वरित वितरित कराव्यात.
जॉर्डन ब्राऊन यांनी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन, बोरीस जॉन्सन आणि इतर नेत्यांना आवाहन केले आहे. या मुद्द्याकडे लक्ष देऊन त्वरित गरीब राष्ट्रांना त्या लक्ष वितरित कराव्यात. नाहीतर मोठ्या संकटाला संपूर्ण जगाला सामोरे जावं लागेल.
गरीब राष्ट्रांना डिसेंबर पर्यंत लसी वितरित करण्याचा कुठलाही प्लँन नाही याचा मोठा धोका होऊ शकतो. यासाठी उपाययोजना तातडीने करावी. अंदाजे एक कोटी लसींचे डोस श्रीमंत राष्ट्रांच्या योग्य नियोजनाअभावी वाया जाऊ शकतात. या लसींच्या अभावामुळे गरीब राष्ट्रातील अनेकांचे जीव जाऊ शकतात. याचा कुठेतरी ताळमेळ घालणे गरजेचे आहे.
यासाठी एकत्र राजकीय इच्छाशक्ती वापरणे गरजेचे आहे आणि ही घटना जागतिक स्तरावर व्हायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.