अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
कोरोना काळात सन्मित्र सहकारी बँकेतील संचालक व सेवक वर्गाने समर्पण भावनेतून अविरत सेवा पुरवली. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबले असतानाही सन्मित्र सहकारी बँकेने ग्राहकांना अखंड सेवा पुरविल्या. अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले तरी बँकेने सेवेत खंड पडू दिला नाही.
कोरोना काळात बँकेने सहाशे रिक्षा चालकांना रिक्षा घेण्यासाठी 100 टक्के कर्ज उपलब्ध करून दिले. ज्यांचे रोजगार गेले होते त्यांना उत्पन्नाचे कुठले साधन नव्हते. अशा लोकांना रिक्षा वाटप केले. कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा असताना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटटर्स खरेदी करण्यासाठी तात्काळ अर्थसाहाय्य देण्यात आले. तसेच महिला कामगारना व रजिस्टर हॉकर्स आणि अनरजिस्टर हॉकर्स यांना तात्काळ अर्थसाहाय्य दिले.
ग्रामीण भागात कुकुटपालन व दुगधव्यवसाय करण्यासाठी तात्काळ कर्ज देण्यात आले. ग्राहक हा अल्प उत्पन्न गटातील, शिवाय अशिक्षित त्यामुळे त्याला आधुनिक बँकींगच्या सेवा वापरणे कोरोना काळात शक्य नव्हते. त्यांची आर्थिक गरज भागविण्याचं मोठं काम बँकेने केले. बँकेत ग्राहकांचा थेट संपर्क येत असूनही सेवक वर्गाने आपला जीव धोक्यात घालून त्यांना सेवा पुरविल्या हे खरोखरच सहकारी बँकींग क्षेत्रासाठी गौरवास्पद व अभिमानास्पद आहे.
बँकींग क्षेत्राला समाजाकडून कौतुकाची थाप फार क्वचितच मिळते. हे लक्षात घेवून ‘ग्रीन वर्ल्ड’ पब्लिकेशने सन्मित्र सहकारी बँकेची निवड ‘ग्रीन वर्ल्ड समर्पण’ या पुरस्कारासाठी निवड केली. हा सोहळा (गुरुवारी) २३ सप्टेंबर २०२१ रोजी कॉसमॉस को-ऑप बँक लि. कॉसमॉस टॉवर, पुणे-५ या ठिकाणी झाला. ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवाल, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सहकार आयुक्त अनिल कवडे, मिलींद काळे (कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
या सोहळ्यास पुरस्कार स्वीकारण्यासाठी सन्मित्र सहकारी बँकेचे चेअरमन सुनिल गायकवाड ,व्हाईस चेअरमन भरतलाल धर्मावत,सुहास आदमाने सी.ई.ओ.तसेच संचालक मंडळ यशवंत साळुंखे,लक्ष्मण कोद्रे ,शुभांगी कोद्रे,रेश्मा हिंगणे,सुदाम जांभुळकर,गणेश फुलारे, चंद्रकांत तोंडारे या वेळी उपस्थित होते.