सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे-सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी येथे सहा ते सात जणांच्या अज्ञात टोळक्याने टेम्पो ड्रायव्हर व त्याच्या सहकाऱ्यास लोखंडी सळईने मारहाण करून जखमी करत सुमारे एक कोटी रुपयांचे सिगरेट 250 बॉक्सची लुट केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात सात लुटारुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी टेम्पो चालक मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय 38 वर्षे रा. बंजारा हिल्स, रोड नंबर 10, गुरूब्रम्हानगर, हैद्राबाद राज्य तेलंगणा) हा दि 21 रोजी आयशर टेंम्पो (क्रमांक AP-22- TA- 2972) मध्ये मोहम्मद इस्माईल या मित्राबरोबर चारमिनार कंपनीचे चार मिनार सिगारेट कंपनीचे 9937175.5 किंमतीचे (जवळपास एक कोटी रुपये ) सिगारेटचे 250 बॉक्स घेऊन पुणेकडे जात होता.
यावेळी टेभुर्णी जवळ सोलापुर-पुणे महामार्गावर सहा ते सात जणांच्या अज्ञात टोळक्याने ड्रायव्हर व त्याच्या जोडीदारास लोखंडी सळईने मारहाण करत जखमी करून 250 बॉक्स सिगारेट चे लुटून नेले.ही घटना मंगळवार दिनांक 21 रोजी सायंकाळी साडेसात ते आठ च्या सुमारास टेंभुर्णी जवळ घडली. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, टेम्पो चालक मोहम्मद यांनी (दिनांक 21) रात्री साडे सात ते आठच्या सुमारास टेभुर्णी (ता.माढा जि.सोलापूर) येथील अहमदनगरकडे जाणारा ब्रीज क्रॉस करून पुढे गेल्यानंतर सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर साधारण 2 ते 3 कि. मी. अंतरावर अनोळखी 6 ते 7 अज्ञात चोरट्यांनी टेम्पो मधील चालक व त्याच्या जोडीदार शिवीगाळ करीत दमदाटी देत व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी करीत टेम्पो मधील सिगारेटची लूट केली.
घटनास्थळाला सोलापूर ग्रामीणचे नुतन अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव व करमाळा उपविभागीय पोलिस अधीकारी डॉ. विशाल हीरे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.