नांदेड : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव (म.) येथील बैलगाडीसह आसना नदी ओलांडताना एक मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. मुलाच्या शोधात आपत्कालीन व्यवस्थापन कार्यरत आहे.
२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. यात बैल मृतावस्थेत आणि गाडी सापडली असून मुलाचा मात्र ठावठिकाणा लागला नाही. आसना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ होत आहे. पिंपळगाव (म.) येथील निवृत्ती बालासाहेब देशमुख यांच्या शेतातील सालगड्याचा मुलगा सुदर्शन इरबाजी झुंजारे (रा. बळेगाव, ता नायगाव) हा नदीतून व बैलगाडीसह रस्ता ओलांडत असताना वाहून गेल्याची घटना घडली.
यावेळी शोध घेतला असता बैल मृतावस्थेत आणि गाडी पिंपळगावच्या शिवारात सापडली, तर मुलगा मात्र अजून बेपत्ता आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी भेट दिली. एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, नदीच्या प्रवाहात वाढ होत असल्यामुळे आणि अंधारामुळे शोध मोहीमेला अडचण जात होती.