माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २४ – राजगड पोलिस ठाणे परिसरातील अनेक वादग्रस्त घटनाक्रमांमुळे पोलीस अधीक्षकांच्या रडारवर आले होते. मात्र नवनियुक्त पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलिस ठाण्याचा कार्यभार सुधारवला असून राजगड पोलिसांनी हद्दीत एकाच दिवसात अनेक बेकायदा दारू धंद्यावर धाडी टाकून जरब बसवली आहे.
यामुळे बेकायदा धंदे करणाऱ्यांनी याचा धसका घेतला आहे. या कारवाईमुळे राजगड पोलिसांचे महिला वर्गातून कौतुक होत आहे. राजगड पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या परिसरातील चालणाऱ्या बेकायदा दारू धंद्यावर दि. २३ गुरुवारी कारवाई करून एकत्रित रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शारदा रणजीत (कंजारभाट रा. माळेगाव), अक्षय संपत सपकाळ रा. तांबड, रमेश पोपट पापळ रा. भोंगवली ( मुळ रा. मांढर ता. पुरंदर ), निलेश तानाजी काकडे (रा. किकवी) अशी बेकायदा धंदे करणाऱ्या आरोपींची नावे असून त्याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा कंजारभट ही माळेगाव गावाच्या हद्दीत सांगवी रोडच्या कडेला राहत्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारू चोरून विक्री करीत असताना आढळली. अक्षय सपकाळ हा तांभाड गावचे हद्दीत स्मशानभूमीचे पाठीमागे आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करताना आढळला.
रमेश पापळ भोंगवली गावचे हददीत परींचे रोडला मांढर खिंडीमध्ये बेकायदेशीर बिगरपरवाना सखु संत्रा नावाच्या दारूच्या विक्री करीत होता. निलेश काकडे हा किकवी गावचे हददीत वागजवाडी फाटा येथे झाडाझुडूपाच्या आडोशाला गावठी हातभटटीची विक्री करीत असताना आढळून आला. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच शारदा, रमेश व अक्षय या तिघांनी सदर घटना स्थळावरून पलायन केले.
राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे, सहायक उपनिरीक्षक संजय ढावरे, हवालदार अजित माने, भगीरथ घुले, महेश खरात, जगदीश शिरसाट, पोलीस नाईक, युवराज धोंडे, गणेश लडकत, योगेश राजीवडे, शरद धेंडे महिला पोलिस नाईक हेमा भुजबळ यांनी धडक कारवाई करून गावठी दारू, देशी दारू, प्लास्टिक जप्त केले आहे. परिसरात चालणाऱ्या बेकायदा धंद्याबाबत नागरिकांनी निडरपणे राजगड पोलिसांना कळवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.