शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर येथील पराग सोमकांत कुलकर्णी याने सी ए परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.
पराग कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला येथे झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण सारडा कॉलेज अहमदनगर तर उर्वरित पदवी पर्यंतचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. आई माधुरी कुलकर्णी या प्राथमिक शिक्षक आहेत.
पराग याने मोठ्या जिद्दीने सी. ए.परीक्षेत यश मिळवले असून या यशात आई वडिलांचा मोठा वाटा असल्याचे बोलताना सांगितले. परागच्या या यशाबद्दल शिरूर शहर व परिसरात अभिनंदन केले जात आहे.