मुंबई : महान्यूज लाईव्ह
अॅंटालिया स्फोटकांच्या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग याला अटक होण्याची शक्यता असून आधीच ते चौकशी आयोगासमोर हजर राहत नाहीत. अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही त्यांची खुली चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी या संदर्भात तक्रार केली असून या तक्रारी अंतर्गत खुल्या चौकशीसाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक अनुप डांगी यांच्या तक्रारीवरून परमवीर सिंग याची चौकशी सुरू केली आहे. या तक्रारीत डांगे यांना निलंबित केल्यानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमवीरसिंग याने डांगे यांना कोटींची लाच मागितली होती. याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे.
या दरम्यानच घाडगे यांनी देखील मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून संबंधित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे. यावरुन सरकारने परमवीर सिंग याची खुली चौकशी करण्यास संमती दिली आहे. परमवीर सिंग याच्या विरोधात घाडगे यांच्या तक्रारीवरून कट करणे, पुरावे नष्ट करणे आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.