महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
भारतात मुस्लिम मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले तर आता कोणालाच काही विशेष वाटत नाही, कारण भारतात सर्वधर्मसमभावाची संकल्पना आणि पाळेमुळे खोलवर रुजलेली आहे. मात्र पाकिस्तानात 27 वर्षीय सना रामचंद्र गुलवानी या मुलीने पहिल्याच प्रयत्नात पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्याची जास्त चर्चा झाली आहे.
पाकिस्तानच्या प्रशासकीय सेंट्रल सुपिरियर सर्विसेस या परीक्षेतून सिंध प्रांतातील ग्रामीण भागातून सना गुलवानी हिने भाग घेतला होता ही परीक्षा अवघड असते एकूण बसलेल्या परीक्षार्थी पैकी दोन टक्के पेक्षाही कमी उमेदवार यामध्ये उत्तीर्ण होतात अशी आजवरची स्थिती आहे, मात्र या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सना हिने यश मिळवत इतिहास रचला आहे.
सना ही शहीद मोहतर्मा बेनजीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीची वैद्यकीय शाखेची पदवीधारक आहे. तिच्या पाकिस्तानमधील यशाची सध्या हिंदुस्तानात चर्चा सुरू आहे.