किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
रात्रीस खेळ चाले या प्रसिध्द मालिकेतील अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर उद्या दुपारी इंदापूरातील सणसरमध्ये येत आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्यासमवेत शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी अभ्यंकर सणसरमध्ये येणार आहेत.
माधव अभ्यंकर यांची आण्णा नाईकांचे पात्र महाराष्ट्रातील घराघरात पोचले आहे. सध्या या मालिकेचा दुसरा पार्ट सुरू आहे. अण्णा नाईक यांच्या भूमिकेविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. परिसरातील आदर्श शिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते गुरूवारी (ता.२३) दुपारी होणार आहे.
आज यांसंदर्भात मेघराज राजेभोसले यांनी माहिती दिली. गुरूवारी माधव अभ्यंकर हे सणसर येथील प्राथमिक शाळेलाही भेट देणार आहेत. सणसर येथील शाळा ग्रामस्थ, युवक, ग्रामपंचायत, सणसर विकास मंचाच्या पुढाकारातून उर्जितावस्थेत आणली. त्या शाळेचीही माहिती अभ्यंकर घेणार आहेत.