विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : शहर आणि परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करून टोळीतील गुन्हे शाखा युनिट -6 च्या पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 20 तोळे सोने, 14 किलो चांदी असा 22 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपींनी लोणी काळभोर, लोणीकंद, कोंढवा, सिंहगड, येरवडा, वानवडी आदी भागातील घरफोडीचे तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सचिन उर्फ राहुल राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय 28, रा. हडपसर), सांरग उर्फ सागर संजय टोळ (वय 25 ) व सनि महेशकुमार तनेजा (वय 31) या तिघांना अटक केली आहे. तर दोघे पसार झाले आहेत.
गुन्हे शाखा युनिट -6 चे पथक गस्त घालत असताना लोणीकंद ते फुलगाव रोड वढू खुर्द फाटा येथे’ सचिन माने व त्याचे साथीदार वाहनांना अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तिघांना पकडले. मात्र यावेळी दोघे पसार झाले.
तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कार, तसेच दरोड्याचे साहित्य असा सव्वा 3 लाखांचा ऐवज जप्त केला. दरम्यान, पोलीस कोठडीत आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी लोणी काळभोर, लोणीकंद, कोंढवा, वानवडी, सिंहगड, येरवडा, चिपळूण, या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मछिद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व ज्योती काळे यांच्या पथकाने केली आहे.