अॅड.विजय सोनवणे, महान्यूज लाईव्ह
नगर-पुणे महामार्गावर काल झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. पुण्याहून नगरकडे जाणारा मालट्रक उभ्या असलेल्या मालट्रकवर आदळला आणि दोन ट्रक ज्यामध्ये दुचाकी सापडली आणि दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, मात्र दुर्दैव असे की, ट्रकचे ब्रेक जोरात दाबले गेल्याने ट्रकमधील लोखंडी अँगल चालकाच्या केबिनमध्ये घुसले आणि चालक व क्लिनरचा जागीच मृत्यू झाला.
नगर-पुणे महामार्गावरील पळवे गावच्या हद्दीत सोमवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. या घटनेत पुरुषोत्तम राजेंद्र चव्हाण (वय 18), राजेंद्र चव्हाण (वय 50 राहणार जातेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड) या बापलेकांचा दोन ट्रकमध्ये चिरडून मृत्यू झाला. तर ट्रक मधील शुभम राजू देशभ्रतार (वय 24 रा. चमोली ता. काटोल जिल्हा नागपूर) व राहुल मधुकर डोंगरे (वय 31, रा. सावली ता. कारंजा जि. वर्धा) यांचा मृत्यू झाला.