दिल्ली : महान्यूज लाईव्ह
दर वर्षी हनुमान जयंतीला मराठी चित्रपटातील एक गाणे हमखास वाजते, ते म्हणजे ‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान’.. यामधील हनुमानाच्या बलस्थानाचे कौतुक करताना, ‘बालपणी गेलासी तू सूर्याला धराया’, ही ओळ आबालवृद्धांना मोहून टाकते. अर्थात सूर्याकडे एकटक बघणे ही शक्य होत नाही असा सूर्य मारुतीने गिळला होता, असे वर्णन या गाण्यात आहे.
वैज्ञानिक युगात मात्र आता इस्त्रो म्हणजे भारत खरोखरच सूर्याला धरायला जाणार आहे. मंगळ आणि चंद्राच्या मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच आता सूर्याची मोहीम टाकणार आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रोने तयारी केली असून आदित्य l1 या नावाचा उपग्रह इस्रो प्रक्षेपित करणार आहे सूर्यापासून पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करेल
इस्रोच्या मानव अवकाश उड्डाण केंद्राचे संचालक डॉ. उन्नीकृष्णन नायर यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ज्या ठिकाणी समसमान आहे त्या बिंदूला एल वन बिंदू असे म्हणतात. या ठिकाणी आदित्य एल वन हा उपग्रह कार्यरत राहील. जो अतिशय शक्तिशाली कॅमेऱ्यातून सूर्याचा अभ्यास करेल.
आतापर्यंत सूर्याचा सखोल अभ्यास करणे कोणालाही शक्य झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर इस्त्रोने थेट सूर्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला असून, अशा स्वरूपाची मोहीम आखली जात आहे. ही मोहीम पूर्णपणे वैज्ञानिक स्वरूपाची असून, सूर्याचा अभ्यास यामध्ये होणार असल्याने तिला अधिक महत्त्व आहे.