किशोर भोईटे, महान्युज लाईव्ह
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लासुर्णे (ता.इंदापुर) येथील बाबासाहेब पाटील यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अॅड तेजसिंह पाटील, डाॅ.योगेश पाटील तसेच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. वैजनाथ पाटील ही त्यांची मुले होत.
बाबासाहेब पाटील यांनी इंदापूर पंचायत समितीचे सभापती पद व छत्रपती कारखान्याचे संचालक पदही भूषविले होते. तालुक्यात एक वेगळ्या पद्धतीचे काम त्यांनी उभे केले होते. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे, सामान्य माणसाला सदैव मदतीचा हात देणारे अशी त्यांची ओळख होती.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार विजयराव मोरे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य हेमंत नरुटे, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक विलास माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अशोकराव घोगरे, छत्रपती कारखान्याचे संचालक ऍड रणजीत निंबाळकर, संचालक बाळासाहेब पाटील, ऍड लक्ष्मणराव शिंगाडे, अविनाश घोलप, दत्तात्रय देवकाते, अशोक पाटील, बाळासाहेब सपकळ, दूध संघाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, महारुद्र पाटील, भाऊसाहेब सपकळ, युवराज रणवरे यांनी छत्रपती कारखान्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बारामती, इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.