दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील यवत येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचास कंटाळून विजेच्या उपकरणाचा शॅाक घेवून आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी यवत
पोलीसांनी सासु, नवरा, दिर आणि नणंद अशा चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या विवाहित महिलेच्या आई आणि नातेवाईकांनी मुलीची आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी तिची हत्याकेल्याचा आरोप केला होता. याप्रकारामुळे यवत पोलीस स्टेशनला काल तणावाचे वातावरण होते.
धनश्री अजित करडे ( रा.यवत ता.दौंड,जि.पुणे ) असे आत्महत्या केलेल्या या विवाहीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शर्मिला राजाराम करडे, अजित राजाराम करडे, सुजित राजाराम करडे (सर्व.रा.यवत,ता.दौंड) तसेच सौ.पूनम कैलास खैरे (रा.खामगाव फाटा, ता.दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धनश्री हिने घरातील विदयुत हिटर या उपकरणास आपल्या छातीस कवटाळून शॉक घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.धनश्री हीला तिची सासु तिचा पती, दिर व नणद हे धनश्री हिस तुला स्वयंपाक निट येत नाही असे म्हणून तिचा वेळोवेळी सर्वासमोर अपमान करीत होते.
चारचाकी गाडी घेण्यासाठी हुडयांची मागणी करून शिवीगाळ दमदाटी करून तिला मानसीक तसेच शाररीक त्रास देत होते, त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद धनश्री हीची आई कविता बापू ढेरे (रा.महंमदवाडी, हडपसर) यांनी यवत पोलीस स्टेशनला दिली आहे.
कविता ढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी सासु, नवरा, दिर आणि नणंद यांच्यावर शाररिक, मानसिक छळ करणे व आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे हे पुढील तपास करीत आहेत.