माणिक पवार: महान्यूज लाईव्ह
भोर : तालुक्यातील सारोळा बसस्थानकाजवळ राजगड पोलिसांनी बेकायदा हातभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून तब्बल दीड लाख रुपयांची गावठी दारू जप्त केली. तर वाहनासह 4 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना अवैध दारू वाहतूकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने रात्रगस्त पेट्रोलिंग अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या त्यानुसार या पथकाने संबंधित वाहनावर पाळत ठेवली.
सारोळा गावचे हददीत सारोळा – वीर रस्त्यावरील सारोळा बसस्थानकाजवळ पहाटे 2:30 वाजता एक संशयीत महीद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक एम एच १२ आर एन ९७४३) आले. ते थांबवून वाहनाची तपासणी केली असता हौद्यामध्ये काळ्या रंगाच्या ताडपत्रीखाली प्लॉस्टीकचे काळे व निळे रंगाचे 35 लिटरचे 40 कॅन गावठी हातभटटी दारू ने भरलेल्या अवस्थेत मिळुन आले.
या पीकअप गाडीसह मालाची पाहणी केली असता त्यामध्ये १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे प्लॅस्टीकचे काळे व निळे रंगांची ३५ लीटर मापाची ४० कॅन अशी एकुण १ हजार ४०० लीटर गावठी हातभटीची तयार दारू किंमत, ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची महींद्रा बोलेरो (पिकअप क्रमांक एम एच १२ / आर एन / ९७४३) असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा माल मिळुन आला.
पोलिसांनी या प्रकरणी राजु लक्ष्मण जानकर (वय २२ वर्षे धंदा डायव्हर रा. चील्हेवाडी ता पुरदंर जि पुणे), महेंद्र राजेंद्र कुंभार (वय ३१ धंदा खाजगी व्यावसाय रा शिरवळ शेखमेरवाडी ता खंडाळा जि सातारा), बाप्पु धोंडीबा कोकरे (वय ३२, धंदा मजुरी रा. कांबरे वा ता. भोर जि पुणे) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहाय्यक फौजदार कदम, पोलीस हवालदार शिरसाठ व पोलीस शिपाई राजीवडे यांनी केलेली असून पुढील अधिक तपास पोलीस हवालदार शिरसाठ हे करत आहेत.