शिरूर : महान्यूज लाईव्ह
इनामगाव (ता. शिरूर) येथील सरपंच पल्लवी संजय घाटगे यांची सरपंच परिषदेच्या शिरूर तालुका महिला कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
याबाबत सरपंच परिषदेची नुकतीच कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी शिरूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यांना सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव, पुणे जिल्हा समन्वयक दीपक खैरे यांच्या उपस्थित निवडीचे पत्र देण्यात आले.
निवडीनंतर बोलताना पल्लवी घाटगे यांनी सांगितले की, संघटनेच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील महिला सरपंचाचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. यावेळी सरपंच संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.