दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे बंद झोपडीचा पडदा बाजूला करून झोपडीतील एक बाजरीचे पोते डोक्यावर घेऊन निघाला असताना अट्टल चोर लाल्या उर्फ शरद दुर्योधन काळे (वय २१ रा. आलेगाव पागा ता. शिरूर जि. पुणे) यास यवत पोलीसांनी अटक केली आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. लाल्या उर्फ शरद दुर्योधन काळे याने आणखी घरफोडी आणि चोरी केली असण्याची शक्यता असून यवत पोलीस तसा तपास करीत आहेत. गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
या आरोपीकडून एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार संदीप कदम,निलेश कदम, गुरू गायकवाड, पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर,मारुती बाराते यांनी ही कामगिरी केलेली आहे.