शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरून विक्री करणाऱ्या आरोपींना रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात मागील एक ते दिड वर्षामध्ये इलेक्ट्रीक डि.पी. मधील तांब्याच्या तारा व पट्ट्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली होती.
त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी डि.पी. चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता आदेश दिलेले होते.
या आदेशानुसार पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळी तपास पथके कार्यन्वित करण्यात आलेली होती. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती करुन पोलीस स्टेशनला दाखल असलेले डि.पी.चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास पथकामधील पोलीस पोलीस अंमलदार पोलिस हवालदार विजय सरजिने, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार संतोष औटी यांनी गोपनिय बातमीच्या आधारे आरोपी सचिन उर्फ गुलट्या सुभाष काळे, आकाश उर्फ गोट्या सुभाष काळे,साहिल उर्फ नट्या उर्फ शैलेश सुधाकर भोसले,एक विधिसंघर्षीत बालक (सर्व रा. गणेगाव खालसा,ता.शिरुर) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दील एकुण ९ डि.पी.चोरी तसेच घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
यातील अटक करण्यात आलेल्या आरोपीनी ज्या भंगार दुकानदारांना सदर डि.पी.चोरीतील तांब्याच्या तारा व पट्टया विकल्या आहेत. ते भंगार दुकानदार उमेश यादव, बलिकरण यादव, गोविंद यादव, हनुमान यादव ( सध्या रा.कोंढापुरी), करिमउल्ला अतिउल्ला मनियार (सध्या रा. खंडाळेमाथा, रांजणगाव), घरभरण यादव औधराम यादव, आकरम यासिन रंगरेज (दोन्ही सध्या रा.शिक्रापुर,ता.शिरुर) यांना डि.पी.चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपीकडुन रांजणगाव, खंडाळे, गणेगाव खालसा, कर्डीलवाडी, निमगाव भोगी, कारेगाव व खंडाळेमाथा येथील एकुण ९ डि.पी. चोरीच्या गुन्ह्यातील 426 किलो वजनाच्या इलेक्ट्रीक डि.पी. मधील 2 लाख 98 हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा व पट्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
तसेच आरोपींनी सदरचा गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने, टाटा कंपनीचा अँशे टेंम्पो क्र. MH 12 GT 343, महेंद्रा मँक्सीमो टेम्पे MH 06 BG 0124 , टाटा कंपनीचा अँशे टेम्पो MH 12 DG 8323, महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH 47 Y 5134, अशी एकूण चार वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
या गुन्ह्यामधील चोरीस गेला मुद्देमाल व वाहने असा एकुण 5 लाख 98 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन जप्त करण्यात आलेला आहे.
या आरोपीनी रांजणगाव पोलीसांना अशाच प्रकारचे डि. पी.चोरीचे गुन्हे शिक्रापुर, शिरुर व यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
रांजणगाव MIDC पोलीसांनी डि.पी.चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्याने परिसरातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, उमेश कुतवळ, विजय शिंदे, विजय सरजिने, विलास आंबेकर, पो.हवा. संतोष औटी, रघुनाथ हाळनोर, वैजनाथ नागरगोजे, वैभव मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग साबळे यांनी केली.