शिरूर : महान्यूज लाईव्ह
बाभुळसर बुद्रूक(तालुका शिरूर) येथे स्वच्छ्ता महाश्रमदान अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच दिपाली नागवडे यांनी दिली.
देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वच्छ्ता महाश्रमदान अभियान आयोजित करण्यात आले होते.यावेळी ग्रामपंचायत परिसरात स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छ्ता करण्यात आली. प्लॅस्टिक तसेच इतर कचरा गोळा करण्यात आला.यावेळी सर्वच परिसर स्वच्छ करण्यात आला.
या अभियानाच्या प्रारंभी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली.स्वच्छ्ता महा श्रमदान अभियानात सरपंच गणेश मचाले, उपसरपंच दिपाली नागवडे, सदस्य सुनील देशवंत, मनीषा नागवडे, मोहिनी रणदिवे, घोडगंगा संचालक वाल्मीकदादा नागवडे, हनुमंत पाटोळे, बाळासाहेब ढमढेरे, संतोष टेकवडे, पंडित नागवडे, महेंद्र नागवडे, मनोज मचाले, संतोष नागवडे, महेंद्र रणदिवे, अल्लाउद्दीन अल्वी, ग्रामसेवक अमित नागवडे, विलास गवळी, महेंद्र नागवडे, सुनीता नागवडे, सुभाष धने, गोरख कोथींबीर, विष्णु चवधर, मिना माने आदींनी सहभाग घेत श्रमदान केले.