लोणार पंचायत समिती भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचा आरोप
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : सावरगाव तेली येथील ओट्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी सरपंच, सचिवांना पाठीशी घालणाऱ्या शाखा अभियंत्यासह सरपंच, सचिवांवर कारवाई करण्यासाठी आमरण ऊपोषण सुरू झाले आहे.
लोणार तालुक्यात असलेल्या सावरगाव तेली येथिल दलित समाज ओट्याचे बांधकाम सन २०२० मध्ये करण्यात आले. या बांधकामावर २ लाख ४९ हजार ५९९ रु खर्च दाखवण्यात आला असून सदर बांधकाम अर्धवट स्थितीत असल्यामुळे या बांधकामाची तक्रार आँल ईंडिया पँथर सेनेचे लोणार तालुकाध्याक्ष अमित काडे यांनी ७ सप्टेंबर २०२१ रोजी गटविकास अधिका-यांना केली.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर ओटा बांधकाम व इतर कामामधे संगनमताने भ्रष्टाचार झाला असून अर्धवट स्थितीत ओटा बांधकाम केल्याने संबधित सरपंच सचिव यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा १५ सप्टेंबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण ऊपोषण करण्याचा इशारा दिला होता.
मात्र पंचायत समिती प्रशासनाने कुठल्याच प्रकारे कारवाई करण्यात आली नसल्यामुळे सावरगाव तेली येथील ग्रामस्थासह आँल ईंडिया पँथर सेनैचे तालुकाध्याक्ष अमित काकडे यांनी आमरण ऊपोषणास सुरुवात केली आहे. सावरगांव तेली येथील ग्रामस्थांनी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी गणेश कृपा राठोडसह इतरांनी तक्रार दाखल केली.
या तक्रारीचा अहवाल ३१ मार्च २०२१ रोजी गटविकास अधिकारी लोणार यांनी दिला. या अहवालामध्ये ३० हजार रुपयांची रक्कम ओटा बांधकामावर खर्ची टाकल्याचे दिसून आले. ओटा बांधकामासाठी साहित्यावर १ लाख ३ हजार ९०० रुपये खर्च करण्यात आले. यासह इतर खर्च करण्यात आला. यामध्ये आवश्यक त्या बाबी नमूद नाहीत असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान उपोषणाला ऑल इंडिया पॅंथरचे सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष रामदास डहाळे यांनी उपोषणाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करायचे मान्य केले. ऑल इंडिया सेनेचे तालुकाध्यक्ष अमित काकडे, अंकुश राठोड, राजेश्वर चव्हाण, सखाराम राठोड आदी उपोषणास बसलेले आहेत. पंचायत समिती उपसभापती मदनराव सुटे, काँग्रेसचे पुरुषोत्तम घायाळ यांनी येथे भेट दिली.