बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका पोलिसांनी शिर्सुफळ येथे केलेल्या कारवाईत एक लाख 38 हजार 628 रुपयाचा बेकायदेशीर गुटखा जप्त केला. शिर्सुफळ येथील सोमनाथ धोंडीबा गोडसे त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी हा गुटखा जप्त केला.
याप्रकरणी तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी अधिक माहिती दिली. सोमनाथ गोडसे (मूळ रा. सौधणी ता. मोहोळ जि. सोलापूर, सध्या राहणार शिर्सुफळ ता. बारामती) याच्यावर प्रतिबंधक अन्नपदार्थ बंदी कारवाई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार शशिकांत पवार, रमेश भोसले, रणजीत मुळीक हे शिर्सुफळ गावात पेट्रोलिंग करत असताना ढवाण यांना मिळालेल्या माहितीनुसार गोडसे यांच्या घरी जाऊन पोलिस पथकाने छापा टाकला. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या. गोडसे हा घरातूनच हा गुटखा विकत होता अशी माहिती मिळाली. 1 लाख 38 हजार 628 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.