बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती वकील संघटनेच्या वतीने कोरोना काळात ज्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून समाजसेवेचे काम केले त्या कोरोना योध्द्यांचा जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते सन्मान व गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन कोरोनाबाबतचे नियम पालन करून करण्यात आले होते. यावेळी कोरोना काळात कोवीङ योद्धा म्हणून कार्य केलेल्या तालुका आरोग्य अधिकारी ङाॅ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक ङाॅ सदानंद काळे, भूलतज्ञ ङाॅ. अडसूळ, ङाॅ बापू भोई , ङाॅ. सुनील दराङे श्री. सचिन कदम, बा.न.प.चे राजेंद्र सोनवणे, श्री. विजय शितोळे व त्यांचे सहकारी यांचा समावेश होता.
जिल्हा न्यायाधीश श्रीमती जे. पी. दरेकर, सर्वश्री न्यायाधीश एस. टी. भालेराव, आर. व्ही. लोखंडे, ए. ए. शहापुरे, डी. बी. बांगडे, जे. ए. शेख यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. बारामती वकील संघटनेचे सदस्य अॅड पी. टी. गांधी यांनी कोरोना काळात गरजूंना अन्नदान केले व अॅड अमर महाङीक यांनी कोवीड सेंटर च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याबद्दल त्यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अॅड. चंद्रकांत सोकटे यांनी केले व सूञ संचालन अॅड अनिल होळकर यांनी केले. कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष बापूराव शिंगाडे, सचिव अॅड अजित बनसोडे, ग्रंथपाल अॅड स्वरूप सोनवणे, महिला प्रतिनिधि अॅड प्रणिता जावळे व वकील उपस्थित होते