दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील बहुतांश सर्व गावांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील केरकचरा, कचरा कुंड्या आणि गावातील रस्ते, चौक झाडून स्वच्छतेची मोहीम राबवली. सरपंचापासून ते शिपायांपर्यंत सर्वांनीच हातात झाडू घेवुन गाव झाडून स्वच्छ केली. महाराष्ट्र शासनाने 16 संप्टेबर रोजी आयोजित केलेल्या स्वच्छता आभियांनास दौंड तालुक्यातील गावांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना 16 सप्टेंबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छता महाश्रमदान दिवस साजरा करणेबाबतचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार दौंड तालुक्यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस, वरवंड,कानगाव,गार- बेटवाडी आदींसह तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीने या स्वच्छता आभियानास सहभाग घेवून गाव स्वच्छ केले.
गुरूवारी (दि.16) सकाळी नऊ वाजल्यापासूनच पाटस ग्रामपंचायतच्या सरपंच अवंतिका शितोळे,उपसरपंच छगन म्हस्के, ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे, ग्रामपंचायत सदस्या सायराबानु शेख, रंजना पोळेकर, इंदुमती शितोळे, छाया भागवत, बायडाबाई ठोंबरे, राजु शिंदे, माणिक चोरमले, बाबा कोळेकर, राजेश सोनवणे, बापु खारतुडे, संजय पांचगे, संजय बोरूडे, नवनाथ कदम, दिपाली मांढरे आदींनी सकाळ नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयापासून हातात झाडू घेवून केरकचरा साफ करण्यास सुरवात केली.
गावातील मुख्य रस्ते,चौक स्वच्छ केले.
कानगाव येथे सरपंच राहुल चाबुकस्वार, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी गावातील घाण, केरकचरा झाडून स्वच्छ केला. गार-बेटवाडी येथे सरपंच डॅा.सुलभा गावडे, ग्रामसेवक भीमराव खोमणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शितकल, नथू पासलकर, फिरज सयद, लिपीक बाबासाहेब जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी गाव कचरा मुक्त केले.
या स्वच्छता मोहीमेत शिक्षिका,आरोग्य वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामस्थांनी सहभागी झाले होते.