जगात आज काय चाललंय : डॉ सुजित अडसूळ, बारामती
इंपीरियल कॉलेज ऑफ लंडन येथे झालेल्या अभ्यासानुसार टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन याद्वारे कोवीडचा प्रसार 26 टक्के कमी करता येतो. या जागतिक महामारी विरुद्ध लढण्याची प्रत्येक देशाची स्वतःची ची एक योजना आहे.
न्यूझीलंडमध्ये जवळ जवळ 0% इन्फेक्शन रेट आला आहे. स्लोव्हाकिया या देशाने संपूर्ण लोकसंख्या म्हणजे 55 लाख लोकांचे टेस्टिंग केलेले आहे. इंग्लंडमध्ये टेस्टिंग आणि ट्रेसिंग याद्वारे नियंत्रण ठेवण्याचे काम चालू आहे.
ऑस्ट्रियामध्ये आरोग्य विमा काढताना RTPCR टेस्ट कंपल्सरी केली आहे.
उपाययोजनांचे मापदंड
WHO चे एक्झिक्युटिवे डिरेक्टर मायकल यांच्यामध्ये प्रत्येक पॉझिटिव्ह केसच्या मागे दहा ते तीस जणांचे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे.
सध्या इटली, जपान, स्पेन हे ह्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात, न्युझीलँड 15 43 टेस्ट ताइवान मध्ये 1489 टेस्ट ऑस्ट्रेलिया 637 टेस्ट सिंगापुर 534 एवढं ट्रेसिंग एका पॉझिटिव्ह रुग्णामागे करतात. परंतु इंग्लंडमध्ये जरा गोंधळल्यासारखे परिस्थिती आहे. प्रत्येक हजार पॉझिटिव्ह टेस्ट च्या मागे 3334 लोकांचं ट्रेसिंग केले जातं.
WHO चे टेक्निकल लीड मारिया यांच्या मते टेस्टिंगची क्षमता ही, साधनसामुग्री आणि तज्ञ मनुष्यबळ यांच्यावर अवलंबून आहे. तसेच फक्त आकडा यापेक्षा ती टेस्ट योग्य वेळेला आणि योग्यरीत्या केली जाणे महत्त्वाचे आहे.
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स चे प्राध्यापक जेम्स गुड यांच्यामध्ये याचे फास्ट टेस्टिंग ,जलद कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्वरित उपचार मिळणं हे महत्त्वाचं आहे.
निष्कर्ष
युरोप आणि अमेरिका पेक्षा अनेक आशिया खंडातील अनेक देशांची कामगीरी याबाबत वरच्या स्थानावर आहे. ज्या देशांना SARS आणि MERS या आजारांशी लढण्याचा अनुभव होता त्यांची कामगिरीही चांगली झाली आहे . वेळेत केलेल्या लॉकडाऊनमुळे व्हायरसचा प्रसार थांबलेला आहे.
पाश्चिमात्य आणि पुढारलेल्या देशांनी वेगळा मार्ग निवडला आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड मध्ये स्थानिक प्रशासनाने प्रत्येकाच्या दारी जाऊन हॉटस्पॉट ची निवड केली आणि उपाय योजना केली परंतु इंग्लंडच्या अनेक संशोधकांनी याबाबत वेगळी मते नोंदवून काही सुचना केलेल्या आहेत. याचा अर्थ संपूर्ण जगामध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन आणि तातडीचे उपचार हेच या महामारीवरती मात करणारी महत्त्वाचे टप्पे आहेत.