पुण्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ
अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत सदर गुन्हयाचा तपास चालु असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव यांना बातमी मिळाली. चोरीला गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल नंबर -एमएम १२/जी. डब्लु / १५३१ ही घेऊन एक मुलगा गुजरवाडी फाटा येथे ट्रकचे गॅरेज जवळ थांबलेला आहे. अशी बातमी मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे फौजदार नितीन शिंदे व इतर पोलीस स्टाफने या ठिकाणी पाहणी केली.
गणेश बाळु ओतारी, (वय २३ वर्षे, रा. मु. पो. शिवाजीनगर, ता. खंडाळा जि. सातारा) यास चोरीच्या गाडीसह ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार रवींद्र भोसले यांनी वरिल आरोपीस वाहनचोरी गुन्हयात अटक केले.
याबाबत त्याच्याकडे आणखी तपास केला असता त्याने आणखी गाड्या चोरी केल्याचे कबुल केले. लपवून ठेवलेले ठिकाण दाखवून तेथुन ६ दुचाकी गाड्या काढून दिल्या.
सदर गाडयांबाबत चौकशी करता सदर गाडया चोरीस गेल्याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे २ गुन्हे, लोणंद पोलीस स्टेशन कडील १ गुन्हा, फलटन पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा चतुःश्रुंगी व कोथरुड पोलीस स्टेशन कडील १ असे ६ गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडुन ७ दुचाकी गाडया जप्त करून एकून १ लाख ५० हजार रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे फौजदार नितीन शिंदे, अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, राजु वेगरे, तुळशीराम टेंभुर्णे यांनी केली.