संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार येथे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध संघटना व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
या वेळी लोणार नगरपरिषदेचे गटनेते भूषण मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन शिंदे यांनी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
या वेळी बोलताना गटनेते भूषण मापारी यांनी संतसेना महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संत सेना महाराज यांनी समाजातील अतिशय गरीब, गावकुसाबाहेरील बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. व्यसनमुक्त समाज, बलवंत समाज असा नारा देणारे ते प्रथम संत होते.
सेना महाराजांचा असाच आवर्जून उल्लेख तत्कालीन समाजसुधारकांनी केला आहे. केवळ एका समाजापुरते त्यांचे कार्य नसून संपूर्ण मानव कल्याण हेच त्यांचे जीवन उदिष्ट होते असे मापारी म्हणाले.
या वेळी एजाज खान यांच्यासह नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश धनेकर, जिवाजी कोकाटे, शाम मोरे, विनायक राऊत, विजय दळवी, प्रमोद वईद, गजानन मोहिते, अमोल धनेकर, सुधाकर काळे आदी समाज बांधव उपस्थित होते