पिंपरी : महान्यूज लाईव्ह
पिंपरी – चिंचवड भागातील मोशी भागातील प्रेमविवाह केलेल्या तलाठ्याने स्वतःच्या डॉक्टर पत्नीची चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले. हे जोडपं इथोपिया सोसायटीत राहत होते.
विजयकुमार साळवे या तलाठी पदावर कार्यरत असणाऱ्या आरोपीने आपली डॉक्टर असलेली पत्नी सरला विजय साळवे हिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सरला गाढ झोपेत असताना विजय कुमार याने हातोडा आणि चाकूने तिचा खून केला. त्याने फरार होण्यापूर्वी चिठ्ठीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला असल्याचे सांगितले होते.