महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
दिल्लीच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या लीना मारिया हिने तब्बल 200 कोटींची खंडणी मागितल्याची प्रकरण उघडकीस आले.
ए आय ए डि एम के पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर हा आरोपी तिहार तुरुंगात आहे. यामध्ये रॅली कीटर कंपनीचे प्रमुख बलविंदर सिंग आणि शिवेंद्र सिंग यांच्याकडे खंडणी मागितल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आणि खंडणी प्रकरणाचा तपास करणारे यंत्रणेच्या तपासात आढळून आले. सुकेश चंद्रशेखर याच्या चौकशी दरम्यान हा प्रकार निष्पन्न झाला.
लीना मारिया ही सुखेशची मैत्रीण आहे. तीने ही दोनशे कोटींची खंडणी मागितली होती. सुकेश हा केंद्रीय कायदा मंत्रालयात वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचे भासवत होता. त्याने रेलीगेटर कंपनीचा प्रमुख बलविंदर सिंग आणि शिवेंद्र सिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी ही ऑफर दिली होती. त्यासाठी शिवेंद्र सिंग ची पत्नी आदिती सिंग ला सुकेश ने फोन करून मागणी केली होती. बलविंदर आणि शिवेंद्र यांच्या कुटुंबीयांकडून सुकेश चंद्रशेखर आणि लीनामार यांनी कोट्यवधींची रक्कम उकळली याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.