खंडाळा : महान्यूज लाईव्ह
शिरवळ येथे पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या पतीला शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.
शिरवळ (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या शिर्के काँलनी याठिकाणी १५ जून २०२१ रोजी पत्नी वनिता वचकल हिला पती काळुराम वचकल याने शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार पत्नी वनिता वचकल हिने शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल केली होती.
त्याचप्रमाणे तक्रार दाखल केल्यानंतर वनिता वचकल हि शिर्के कॉलनी याठिकाणी कपडे आणण्याकरिता गेली असता त्याठिकाणी असणाऱ्या प्रेयसी मनीषा जयसिंग लोहार (वय ३४,रा.किकली ता.वाई) हिला पत्नी वनिता वचकल हिने तू येथे का आली आहेस अशी विचारणा केली.
त्यावरून पती काळुराम वचकल याने रात्री १०.४५ वाजण्याच्या दरम्यान स्वयंपाकघरातील चाकू आणून पत्नी वनिता वचकल हिच्यावर वार करीत गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर प्रेयसी मनीषा लोहार हिने पत्नी वनिता वचकल हिची आई शोभा दिलीप गिरी (रा.शिंदेवाडी ता.भोर जि.पुणे ) हिच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले होते. त्याचप्रमाणे मेव्हना संदीप गिरी याला पती काळुराम वचकल याने ढकलून देत जखमी केले होते.
यावरून शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून काळुराम वचकल व मनीषा लोहार हे दोघे फरार झाले होते. शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार संजय पंडित, वैभव सूर्यवंशी, आप्पासाहेब कोलवडकर, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, नितीन महांगरे यांच्या पथकाने कसोशीने प्रयत्न करीत मनीषा लोहार हिला सातारा जिल्ह्यात तर काळुराम वचकल याच्या पुणे जिल्ह्यात जेजुरी परिसरात मोठ्या शिताफीने पाठलाग करीत मुसक्या आवळल्या आहे.
दरम्यान,काळुराम वचकल व मनीषा लोहार हिला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास फौजदार वृषाली देसाई ह्या करीत आहेत.