सोमेश्वरनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी
फ्री बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर मध्ये आरोग्य केंद्र असावे येथील ऊस तोडणी मजूर तसेच स्थानिकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे असे पत्र कार्यकर्त्याने 28 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते त्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी राज्य शासनाने येथील आरोग्य केंद्राला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली…!
सत्ता असो अथवा नसो अजित पवारांच्या भोवती गर्दी का असते? याचे उत्तर देणारी ही प्रशासकीय मंजुरी आहे. कोणतेही काम होणार असेल तर लगेच हो; होत असेल तर तातडीने आणि जे होणार आहे ते विनाविलंब झाले पाहिजे यासाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांपैकी अजित दादा हे एक आहेत. त्यातूनच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र ‘विशेष बाब’ म्हणून मंजूर करण्यात आले आहे.
सोमेश्वरनगर येथील आरोग्य केंद्रासाठी सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत,ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड,पांडुरंग भोसले, तुषार सकुंडे यांनी पाठपुरावा केला होता. गायकवाड यांनी उपमुख्यमंत्र्यांना 28 ऑगस्ट रोजी पत्र दिले होते. यासाठी जिल्हा परिषद सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे पाठपुरावा केला, त्याला यश आले.
होळ येथील आरोग्य केंद्राला १९ गावांचा भार आहे. सोमेश्वरनगरपासून १५ किलोमीटरचे अंतर असल्याने तेथे जाणे शक्य होत नाही. आता हे केंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांतील रुग्णांसाठी ते वरदान ठरणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड यांनी सांगितले.