मुंबई : महान्यूज लाईव्ह
मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची अट शिथिल करण्याची मागणी राज्य सरकार करत आहे मग ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी का करत नाही? असा सवाल ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारला केला आहे.
यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र लिहून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घालण्यात आलेली 50 टक्के मर्यादेची अट उठवण्याची मागणी केली आहे. यासाठी कलम 243 ड अंतर्गत घटनादुरुस्ती करण्याची हरीभाऊ राठोड यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे.
यासोबतच इंपेरिकल डेटा संदर्भात राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. छगन भुजबळ जर स्वतःला ओबीसीचे नेते म्हणत असतील, तर त्यांनी अशी मागणी करु नये. राज्य सरकारला जर वाटलं, तर दोन महिन्यात हा डेटा तयार होऊ शकतो. इंपेरिकल डेटा म्हणजे काय हे तरी माहित आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
यासोबतच देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घटनादुरुस्ती मागणी करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.