सिंधुदुर्ग : महान्यूज लाईव्ह
महावितरणच्या अनागोंदी कारभाराच्या अनेक तक्रारीनंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली.
यावेळी सकाळी अकरा वाजेपर्यंत 35 कर्मचाऱ्यांपैकी फक्त एकच कर्मचारी उपस्थित असल्याचं निदर्शनास आले. यावेळी मस्टर तपासले असता, काही मागील दिवसाचे कोरे रेकॉर्ड असल्याचे निदर्शनास आले. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी,
मुख्य अधिक्षक अभियंता श्री पाटील यांना जाब विचारला.
गणेशोत्सवाच्या तोंडावर कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नसतील तर नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष कोण देणार त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, तसेच प्रलंबित मीटरची जोडणी येत्या तीन दिवसात करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच महावितरण कार्यालयात पुन्हा वेळेत कर्मचारी उपस्थित नसल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.